
देगलूर : अवैध रेतीची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर तमलुर जवळील लेंडी नदी पात्रातून पोलिसांनी रेतीसह जप्त केले आहेत. ही कार्यवाही शनिवारी ता.८ रोजी रात्री करण्यात आली. दरम्यान शासकीय रेती केंद्राचे लिलाव होण्याअगोदरच रेती तस्करांनी लेंडी व मांजरा नदीमध्ये उच्छाद मांडला असून यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे उत्तमराव भांजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.