जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पंधरा जणांना अटक

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 12 जून 2019

या कारवाईमुळे शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस अधिक्षक याबाबत काय निर्णय घेतात तो येणारा काळच सांगेल. या प्रकरणी शिवप्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

नांदेड : शहराच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्रावस्ती नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर टीन पत्र्याच्या घरात झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना मिळाली. त्यांनी आपले पथक कार्यरत केले.

पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी मोठा फौजफाटा सोबत घेऊन बुधवारी 12 जुन पहाटे साडेतीनच्या सुमारास श्रावस्ती नगरातील या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिस दिसताच अनेकांनी अड्यावरून धूम ठोकली. मात्र फरार असल्याने 15 पोलिसांच्या ताब्यात आले. घटनास्थळावरून रोख 80 हजार, पंचेचाळीस हजाराचे मोबाईल आणि काही दुचाकी असा अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या कारवाईमुळे शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस अधिक्षक याबाबत काय निर्णय घेतात तो येणारा काळच सांगेल. या प्रकरणी शिवप्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police seized on gambling spot in Nanded