अवैध दारु विक्रीसह जुगार अड्डयावर कारवाई  ,   

सुभाष बिडे  
बुधवार, 25 मार्च 2020

घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापा टाकून देशी दारु विक्रेता व हातभट्टी तयार करणाऱ्यांवर व जुगार खेळविणाऱ्यांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले.

घनसावंगी (जि.जालना) -   पोलिसांनी बुधवार (ता.२५) अवैधरित्या देशी दारू विक्री करणार्‍यासह हातभट्टीचा अड्डा व जुगार अड्ड्यावर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापा टाकून देशी दारु विक्रेता व हातभट्टी तयार करणाऱ्यांवर व जुगार खेळविणाऱ्यांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले. यात घनसावंगी  येथे बजाज कॉम्प्लेक्स परिसरात २ हजार ४०० रुपये किमतीच्या ४८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत संशयित भाऊसाहेब कराळे (रा. बदनापूर हल्ली मुक्काम बजाज कॉम्प्लेक्स) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

घोन्सी बुद्रुक (ता.घनसावंगी) येथे हातभट्टी तयार करण्याचे रसायन व इतर साहित्य असे  ४ हजार १०० रुपयाची किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले, यात एका महिलेविरूद्ध कारवाई करण्यात आली. तसेच घोन्सी बुद्रुक येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये १ हजार २५० रुपये किमतीची २४ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी संशयित अशोक भाऊसाहेब हर्ष (रा. कुंभार पिंपळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

पानेवाडी येथील एका जुगार अड्डयावर छापा टाकून अठराशे रुपये किमंतीचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित दामोदर शिंदे,  राजाराम रामभाऊ माळवदे,  सय्यद बुराण सय्यद अब्दुल , संजय शामसुंदर सोलाट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police take action in Ghansawangi