esakal | जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : कोरोनामुळे सध्या स्टील कारखान्‍यातील शुकशुकाट. 

जालना येथील स्टील महाराष्ट्रासह देशात आणि जगभर निर्यात केले जाते. या स्टील उद्योगामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जालना येथील स्टील कंपन्यांनी सरकारच्या आवाहनास साथ देत उत्पादन बंद केले आहे.

जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना - स्टील उद्योगामुळे जालना शहराची जगभरात ओळख निर्माण आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर जालन्याच्या उद्योग इतिहासात प्रथमच स्टील उद्योग पूर्णपणे बंद झाला आहेत. त्यामुळे भविष्यात उद्योगाला शेकडो कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात पूर्णपणे लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योग ही ठप्प झाला आहे. जालना येथील स्टील महाराष्ट्रासह देशात आणि जगभर निर्यात केले जाते. या स्टील उद्योगामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जालना येथील स्टील कंपन्यांनी सरकारच्या आवाहनास साथ देत उत्पादन बंद केले आहे. तसेच सर्व कर्मचारी, कामगार यांना सुटी देण्यात आली असून कंपन्यांनी त्यांना रेशन, पैसे पुरविले आहेत. 
दरम्यान जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद ठेवल्याने स्टील उद्योजकांना शेकडो कोटींचा फटका सहन करण्याची वेळ येणार आहे. या तोट्यातून सावरण्यासाठी भविष्यात स्टील उद्योगाला शासनाच्या मदतीचा हाताची गरज भासणार आहे, यात शंका नाही. 

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून सर्व स्टील उद्योग प्रथमच बंद ठेवण्यात आला आहेत. कंपन्या बंद असल्या तरी वीज बिल, बँकाचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू राहणार आहे, त्यामुळे स्टील उद्योगाला भविष्यात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल. 
नितीन काबरा, पोलाद स्टील,जालना 

केंद्र आणि राज्य शासनाच्या आवाहनाला साथ देत जालना येथील सर्व स्टील उद्योग बंद ठेवला आहे. यामुळे आर्थिक संकट येणार आहे, पण सध्याच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे. 
-घनश्याम गोयल, कालिका स्टील , जालना 

loading image
go to top