Osmanabad : ‘त्या’ शेतकऱ्याच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना

गट क्रमांक २१३ मध्ये अफूची झाडे असल्याची गुप्त माहिती रेणापूर पोलीसांना मिळाल्यानंतर अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती उपनिरीक्षक कन्हेरे यांनी दिली.
police team dispatched search farmer
police team dispatched search farmer sakal

रेणापूर - येथे शेतात अफूची बोंड फूल आलेली ६८० झाडे आढळून आल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) उघडकीस आली असून याप्रकरणी मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. आरोपी शेतकऱ्यांच्या अटकेसाठी रेणापूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

मोरवड ता. रेणापूर येथील गट क्रमांक २१३ मध्ये अफूची झाडे असल्याची गुप्त माहिती रेणापूर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दीपक शिंदे, उपनिरीक्षक बालाजी भंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब कन्हेरे,

जमादार गौतम घाडगे, श्रीकिशन शेळके, किरण गंभिरे , कृषी विभागाचे रामकिशन बानापुरे यांनी मोरवड येथील गट क्रमांक २१३ मध्ये जाऊन पाह़णी केल्यानंतर अफूची बोंड फूल आलेली ६८० झाडे आढळून आली याचे वजन २१ किलो.

२०० ग्रॕम झाले असून याची किंमत १ लाख ४८ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी शेतकरी विठ्ठल क्षीरसागर हा फरारी असून त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती उपनिरीक्षक कन्हेरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com