esakal | परभणी जिल्ह्यातील दोन लाखाच्यावर बालकांना आज देणार पोलिओचा डोस
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिण्यात पोलिओचा डोस दिला जातो.

परभणी जिल्ह्यातील दोन लाखाच्यावर बालकांना आज देणार पोलिओचा डोस

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः पोलिओ मुक्त भारत करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ता. 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे तयार असून तब्बल दोन लाख 14 हजार 43 बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी एक हजार 757 बुथ तयार करण्यात आले असून तीन हजार 942 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिण्यात पोलिओचा डोस दिला जातो. परंतू यंदा आलेल्या कोरोना विषाणु संक्रमणामुळे हा डोस देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतू आता जिल्ह्यातील कोरोना विषाणु संक्रमण कमी झाल्याने पल्स पोलिओ मोहिम परत हाती घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात तीन भाग करण्यात आले असून त्यात ग्रामीण, शहरी व महापालिका हद्द यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी पोलिओचे डोस सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिले जाणार आहेत.

ग्रामीण भागाची जबबादारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असून ग्रामीण भागात सर्वाधिक एक लाख 15 हजार 600 लाभार्थी आहेत. त्यात जिंतूर तालुक्यात अपेक्षित लाभार्थी 24 हजार 432 आहेत. गंगाखेड तालुक्यात 12 हजार 493, मानवत तालुक्यात सात हजार 397, पालम तालुक्यात आठ हजार 290, पाथरी तालुक्यात 10 हजार 637, परभणी तालुक्यात 21 हजार 174, पूर्णा तालुक्यात 11 हजार 648, सेलू तालुक्यात नऊ हजार 588 तर सोनपेठ तालुक्यात नऊ हजार 942 अपेक्षित लाभार्थी आहेत.

तसेच उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड अतंर्गत 27 बुथवर सहा हजार 640, ग्रामीण रुग्णालय जिंतूर अतंर्गत 32 बुथवर सहा हजार 937, उपजिल्हा रुग्णालय सेलूतंर्गत 27 बुथवर सात हजार 228, ग्रामीण रुग्णालय मानवततंर्गत 16 बुथवर सहा हजार 110, ग्रामीण रुग्णालय पाथरीतंर्गत 21 बुथवर पाच हजार 500, ग्रामीण रुग्णालय पूर्णातंर्गत 22 बुथवर पाच हजार 893, ग्रामीण रुग्णालय पालमतंर्गत 14 बुथवर एक हजार 924, प्राथमिक आरोग्य केंद्र सोनपेठतंर्गत 30 बुथवर दोन हजार 211 अपेक्षित लाभार्थी आहेत.

मोहिमेसाठी टाक्सफोर्सची बैठक

शनिवारी (ता. 3०) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली टाक्स फोर्सची बैठक झाली. यात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी.देशमुख, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. गणेश सिरसुलवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यासह सर्व वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

"पल्स पोलिओ मोहिमेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.जिल्ह्यातील पालकांनी त्यांच्या शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस आवश्य द्यावा. "

-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image