उमरगा (जि. धाराशिव) - उमरगा नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या बारा उमेदवारापैकी अपक्ष उमेदवार नितीन होळे यांनी गुरुवारी (ता.२०) माघार घेतली. शुक्रवार (ता. २१) उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे..या पार्श्वभूमीवर स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरण्याची तयारी करुन ताठर भूमिका घेतलेल्या महायुती व महाविकास आघाडीत समझोता होण्याचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात, हे स्पष्ट होईल.उमरगा पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने प्रबळ झछुकांची संख्या वाढली आहे. शिवसेना, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह १२ उमेदवाराचे अर्ज वैध ठरले होते..त्यातील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले नितीन होळे ११ उमेदवाराचे १२ वैध अर्ज शिल्लक आहेत. सदस्य पदासाठी १२७ उमेदवारांचे १४२ वैध अर्ज शिल्लक आहेत. दरम्यान शुक्रवार अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस शिल्लक असल्याने या दिवशी होणाऱ्या नाट्यमय घडामोडीनंतर किती अर्ज शिल्लक रहातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..मुरुमकरांच्या निर्णयाकडे लक्ष!महायुती होण्यासाठी भाजपाचे नेते, माजी मंत्री बसवराज पाटील यांचा निर्णय महत्वाचा असल्याने, या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशीरापर्यंत बऱ्याच घडामोडी सुरु होत्या. वास्तविकतः भाजपाने स्वबळाची तयारी करून नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला अन् त्यादृष्टीने प्रचारही सुरू केला आहे..परिणामी शिवसेनेकडे नगराध्यक्षपदाची जागा देण्याबाबतची नकारात्मक भूमिका दिसत आहे; तरीही काही तरी तडजोड करण्याच्या हालचाली रात्री उशीरापर्यंत होत्या. मुरुम पालिकेचे नगराध्यक्षपद भाजपाकडे असल्याने, उमरग्यातही भाजपच का? अशी भूमिका शिवसेनेची आहे. यात तडजोड होत नसेल तर भाजप आणि शिवसेना दोन्ही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवेल का?मुरूममध्ये भाजपाला 'सरळ मार्ग' मिळण्यासाठी प्रयत्न होतील का? हे पहावे लागेल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) भुमिकाही गुलदस्त्यात असली तरी उमरग्यात ऐनवेळी ते भाजपसोबत जातील. परंतु मुरुममधील भूमिका वेगळी असू शकते..फुटीची ठिणगी महाविकास आघाडीला महागात पडेल!विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकजुट विजयासाठी महत्वपूर्ण ठरली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अनपेक्षित यश मिळाले खरे; पण एक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच पालिका निवडणुकीत त्यांनी स्वबळाची भूमिका घेतल्याने काँग्रेसने सावध पावित्रा घेत नगराध्यक्ष पदासाठी बहुजनातील मितभाषी चेहरा दिला आहे..जातीय गणिताच्या बेरजेच्या राजकारणातुन यश मिळवायचे असेल तर महाविकास आघाडीतील फुटीची ठिणगी विझली पाहिजे. सध्या तरी या ठिणगीचे निखारे पसरलेले दिसताहेत. ही बाब त्यांना कितपत परवडेल हे पहावे लागेल. दरम्यान शुक्रवारचा अखेरचा दिवस महाविकास आघाडीला एकत्र होण्याचा आहे, त्यासाठी गुरुवारी रात्री नेमक्या काही हालचाली होतात का ? हे पहावे लागेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.