देशमुखांचा राजा तर धनंजय मुंडेचा तुफान दाखल!

अभय कुळकजाईकर : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगावच्या खंडोबा यात्रेत विविध राजकीय नेते आणि त्यांच्या घराण्याशी संबंधित पशू दरवर्षी दाखल होत असतात. दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे तर माळेगावचा खंडोबा हे कुलदैवत त्यामुळे ते आवर्जून हजेरी लावत असत. आता त्यांची मुले आणि वैशालीताई देशमुख या यात्रेच्या दरम्यान देवदर्शनासाठी येत असतात.

नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगावच्या खंडोबा यात्रेत विविध राजकीय नेते आणि त्यांच्या घराण्याशी संबंधित पशू दरवर्षी दाखल होत असतात. दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे तर माळेगावचा खंडोबा हे कुलदैवत त्यामुळे ते आवर्जून हजेरी लावत असत. आता त्यांची मुले आणि वैशालीताई देशमुख या यात्रेच्या दरम्यान देवदर्शनासाठी येत असतात.

देशमुख यांची माधुरी घोडी माळेगावच्या यात्रेचे विशेष आकर्षण असे. मात्र तिचा मृत्यू झाल्यामुळे यंदा त्यांचा "राजा' घोडा यात्रेत दाखल झाला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांचा "तुफान' घोडा या वर्षीही माळेगावच्या यात्रेत दाखल झाल्यामुळे या दोन अश्‍वांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.

राजकारणात "दो हंसो का जोडा'म्हणून ओळख असलेले विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंढे यांचे घोडे मालेगावात येत असत. त्यामुळे या दोन राजकीय नेत्यांच्या घोड्यामुळे मालेगावच्या घोडे बाजारात रंगत येत असे व दरवर्षी येणारे हे घोडे यात्रेचे आकर्षण ठरायचे.

गेल्या वर्षी देशमुख यांच्या माधुरी घोडीचे निधन झाल्यामुळे देशमुख कुटुंबियांनी राजा नावाचा घोडा घेतला आहे. मात्र अनेकजण "माधुरी'ची चर्चा करत होते. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा "तुफान' घोडा मागील काही वर्षापासून येत आहे. दोन वर्षांपूर्वी पंडितअण्णा मुंढे माळेगाव यात्रेत "तुफान'सोबत आले होते. दरवर्षी या घोड्यांमुळे राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होते व लोकांनाही राजकीय नेत्यांच्या घोड्यांचे मोठे आकर्षण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

साडेतीन लाखाचा श्‍वान दाखल
या यात्रेचे वैशिष्ट म्हणजे कृषि आणि पशू प्रदर्शन. देशभरातून वेगवेगळ्या प्रजातीचे अश्व, श्वान, उंट, गाढव आदी प्राणी पशुपालकासह दाखल होत असतात. माळेगाव येथील ही यात्रा पशुप्रदर्शनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. येथे अनेक जातींचे पशु प्रदर्शन व विक्रीसाठी येत असतात. येथील घोडा बाजार जसा प्रसिद्ध आहे तसाच येथे गाढव, उंट, माकड, लाल कंधारी वळु, गाय , देवणी वळु, श्वान यांचा बाजार यात्रेकरुंच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. घोड्याची किंमत तर चार चाकी वाहनांपेक्षाही जास्त असते.
या वर्षी माळेगाव यात्रेत साडेतीन लाख व अडीच लाखाचे श्वान यात्रेकरुंचे लक्ष वेधून घेत आहेत. परभणी जिल्ह्यातील पाथरीचे आमदार मोहन फड यांचा बर्मन टायगर जातीचा नर श्वान साडेतीन लाख किमतीचा आहे तर गुलमीस्ट जातीची मादी अडीच लक्ष रुपये किमतीची आहे. हे दोन्ही श्‍वान प्रदर्शनासाठी इथं यात्रेत दाखल झाले आहेत.

Web Title: Political leaders horse in local yatras