Political News : वैर संपले; पण तिढा कायम! परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे की धनंजय मुंडे?

मजबूत संघटन असलेल्या शिवसेनेत फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाले.
munde family
munde family sakal

छत्रपती संभाजीनगर - ‘मुंडे’ कुटुंबाला‌ वगळून महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊच शकत नाही. मागील काही वर्षांपासून या कुटुंबांतील सदस्यच एकमेकांचे राजकीय विरोधक झाले होते. पण, आता या वर्षभरात हा संघर्ष मावळला. तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आता आमचा विरोध संपला असे सांगितले. पण, राजकीय वैर जरी संपले असले तरी आगामी निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे की पंकजा मुंडे यापैकी कोण उमेदवार असेल, हा तिढा कायम असेल.

दरम्यान, परळीतून धनंजय तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डीतून पंकजा असा यावर तोडगा निघू शकतो. तसे संकेत खुद्द पंकजा यांनी दिले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात मागील तीन दशकांत झाले नाहीत एवढे बदल या तीन वर्षांत झाले. चांदा ते बांदा मजबूत संघटन असलेल्या शिवसेनेत फूट पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाले. हे दोन्हीही पक्ष मराठवाड्यात मजबूत आहेत. खास करून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे.‌ पण, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ देत युती सरकारला पाठिंबा दिला. त्यांना मंत्रिपदही मिळाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) आणि भाजप अशा तीन पक्षांचे बळ त्यांना आहे.

munde family
Beed News : सेलूत ज्ञानराधा बँकेत ठेविदारांची गर्दी; श्री. कुटे अडचणीत येतील का?

परिणामी, विधानसभेच्या परळी मतदारसंघातून त्यांची दावेदारी प्रबळ आहे. अशातच पंकजा या भाजपपासून दुरावल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.‌ पण, दुसरीकडे भाऊ धनंजय यांच्याशी त्यांचे राजकीय वैरही संपल्याचे दिसत आहे. त्यामुळे परळीत धनंजय यांच्या पाठीशी राहून पंकजा यांनी स्वतः शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे दिसते. त्यादृष्टीने मुंडे कुटुंबीयांनी तयारीही केली आहे. एवढेच नाही तर शेवगाव-पाथर्डीतून पंकजा यांना उमेदवारी मिळावी यासाठी धनंजय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरकसपणे प्रयत्न करू शकतात.

आमदार राजळे गटबाजीने त्रस्त

लोकसभेच्या बीड मतदारसंघात मुंडे कुटुंबातील सदस्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेच्या परळी मतदारसंघातही हेच चित्र आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे गटबाजीने त्रस्त आहेत. ही गटबाजी टाळण्यासाठी भाजपकडे या मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याशिवाय दुसरा ताकदीचा उमेदवार नाही.

munde family
Beed : जिल्हा नियोजनच्या निधीची चावी सावेंकडेच ; १४ तारखेला बैठक ४१० कोटींच्या निधीचे होणार नियोजन

पाथर्डी-शेवगावच का?

या मतदारसंघात मराठा व वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. वंजारी समाजावर ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आजही या परिसरात पगडा आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबाशी पाथर्डीचे भावनिक नाते आहे. मुंडे कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा यांना स्थान आहे. त्यामुळेच मुंडे कुटुंबातील सदस्यासाठी हा मतदारसंघ सोयीचा आहे. त्यामुळेच पंकजा या मतदारसंघात मोर्चेबांधणी करीत असल्याची चर्चा आहे.

असे करणार नेतृत्व

पंकजा मुंडे या भावा-बहिणीच्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण झाला. त्यातच धनंजय यांना आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले. बीडच्या राजकारणात मुंडे बंधू-भगिनींमधील संघर्ष दोघांनाही परवडणारा नाही, याची जाण असल्यानेच त्यांच्यात अलिखित करार झाल्याची चर्चा आहे. विधानसभेसाठी धनंजय परळीतून, शेवगाव-पाथर्डीतून पंकजा, लोकसभेच्या बीड जागेसाठी डॉ. प्रीतम मुंडे असे आगामी नियोजन असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com