

All 10 Chakur Panchayat Samiti Members Unite Against Block Development Officer
esakal
-प्रशांत शेटे
चाकूर: चाकूर पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण बैठकीत गटविकास अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व दहा पंचायत समिती सदस्यांनी गुरुवारी (ता.२) त्यांच्या विरोधात एकमताने अविश्वास ठराव मंजूर केला. गटविकास अधिकारी मनमानी कारभार करीत असून पंचायत समितीच्या ठरावांना व लोकप्रतिनिधींच्या सूचनांना जाणीवपूर्वक बगल देत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.