Amol Birajdar
sakal
लोहारा (जि. धाराशिव) - लोहारा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २५) बिराजदार यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षप्रवेशाचा निर्णय निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या या निर्णयामुळे लोहारा तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.