
Flood Damage
sakal
औसा : नदी-नाल्यांवर पूल बांधताना पूरस्थितीचा गंभीर विचार करणे अत्यावश्यक असतानाच केवळ तांत्रिक औपचारिकतेवर आधारित काम केल्याने मोठे संकट ओढवते, हे उजनीच्या पूरस्थितीने स्पष्ट झाले आहे. पुलाची उंची व गाळे कमी ठेवल्याने तेरणा नदीला आलेल्या पुराचे पाणी आडून गाव व शेतात शिरले. परिणामी घरांमध्ये, बाजारपेठेत व शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.