esakal | बीड : संभ्रमावस्थेतील प्रकाश सोळंकेही परत आले
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Solanke's returned
  • पुन्हा शरद पवारांसोबत
  • पक्षाच्या सेंटर बैठकीला उपस्थिती
  • सकाळपासून होते नाॅट रिचेबल

बीड : संभ्रमावस्थेतील प्रकाश सोळंकेही परत आले

sakal_logo
By
पांडुरंग उगले

माजलगाव (बीड) - शनिवारी सकाळीच झालेल्या नाट्यमय घडामोडीने संपूर्ण राज्याला हादरा दिला. राष्ट्रवादीत फुटू पाडून काही आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अजित पवारांसोबत असलेले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके पुन्हा शरद पवारांसोबत परत आले आहेत. 

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली होऊन मुख्यमंत्रीपदासाठी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते परंतु; शनिवारी सकाळी अचानक अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
त्यानंतर पक्षप्रमुख शरद पवारांनी हा पक्षाचा निर्णय नसल्याचे जाहीर करून मोठा धक्का दिला.

यामुळे राष्ट्रवादी, पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. यात विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेही सकाळपासून नाॅट रिचेबल होते. सकाळी अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांपैकी सात, आठ आमदार परत आल्यानंतर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेही सायंकाळी मुंबई येथील वायबी सेंटरच्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेही त्यांच्या सोबत परत आले आहेत.

हेही वाचा - पवार कुटुंबात कोण काय करतंय?

केला होता गौप्यस्फोट 

शरद पवारांनी सांगितल्याशिवाय अजित पवार येवढा मोठा निर्णय घेणार नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी सकाळी केला होता. त्यानंतर शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मी मोठ्या संभ्रमात पडलो असल्याचे विधानही त्यांनी केले होते; परंतु संभ्रमावस्थेतील माजलगावचे प्रकाश सोळंके पुन्हा शरद पवारांसोबत आले आहेत.
 

loading image