esakal | Corona Vaccination: उस्मानाबाद जिल्ह्यात आज गरोदर मातांनाचेही लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

Corona Vaccination: उस्मानाबाद जिल्ह्यात आज गरोदर मातांनाचेही लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: गरोदर मातांनाही आता कोविड प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. नऊ) अशा महिलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्तनदा माता यांच्याकरिता यापूर्वीच लसीकरण सुरू केले असून, आता त्यामध्ये गरोदर महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाच्या बचावासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याने अधिकाधिक लसीकरण व्हावे ही शासनाची भूमिका आहे. प्रतिबंधक लस यापूर्वी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, १८ वर्षांवरील नागरिक, स्तनदा माता यांच्याकरिता यापूर्वीच सुरू केली आहे. आता ही लस गरोदर मातांनादेखील देण्यात येणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गरोदर मातांना कोविड आजाराचा धोका व कोविड प्रतिबंधक लसीमुळे फायदे याचा विचार करून कोविड लस घेण्याबाबत मान्यता दिली आहे.

हेही वाचा: 'प्रामाणिकपणाने भावाला उंचीवर नेले'; डॉ. कराडांच्या भगिनीचे मनोगत

सध्या उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी गरोदरपणामध्ये देण्यासाठी सुरक्षित आहेत. ती दिल्यामुळे गरोदर मातांचे कोरोनापासून संरक्षण मिळू शकते. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामधून गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

loading image