esakal | Osmanabad :अतिवृष्टीमुळे १४६ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad

अतिवृष्टीमुळे १४६ कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात सुमारे १४६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलाअसून बाधीत क्षेत्राचा आकडा सुमारे दोन लाख ६६ हेक्टर क्षेत्रावर पोहचला आहे. यामध्ये सुमारे दोन लाख ८८ हजार १३७ शेतकरी बाधीतझाले आहेत. जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडूनगेली आहे. तर काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत. यासाठी प्रशासनाने पंचनाम्याचे काम सुरू केले असून प्राथमिक स्तरावर नुकसानीचाअंदाज वर्तविला असून घरांची पडझड झाली असून जनावरे दगावली आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातून प्रशासनाने याबाबत माहिती संकलीतकेली आहे. यामध्ये रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८२ किलोमीटरचे रस्ते खराब झाले असून त्यासाठी २२ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीची आवश्यक आहे.जिल्हा परिषदेच्या ताब्यातील सुमारे ५२ किलोमीटरचे रस्ते खराब झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे २९ कोटी २२ लाख रुपयांचा निधीचीआवश्यकता आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील १०९ पुलांची दुरावस्था झाली आहे.

त्यांची दुरुस्ती करावी लागणारअसून त्यासाठी ३८ कोटी ७६ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ताब्यातील पाच पाझर तलाव फुटलेआहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. तसेच महावितरणच्या पायाभूत सुविधेचेही नुकसान झालेअसून त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ५० लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

जिवीतहानीसह घरांची पडझड

अतिवृष्टीने जिल्ह्यातील वाशी आणि उस्मानाबाद तालुक्यातल्या प्रत्येकी एक अशा दोन व्यक्ती मयत झाल्या आहेत. तर ११० जनावरे वाहूनगेल्याने संबंधीत शेतकऱ्यांना सुमारे ३३ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यात काही नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे.यामध्ये एक हजार ८७ घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत म्हणून ६५ लाख २२ हजार रुपयांचा निधी मदतीसाठी उपलब्ध करून दिलाजाणार आहे.

मयत झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबियांना जिल्हा स्तरावरून तात्काळ मदत देणार आहोत. उर्वरीत मदतीसाठी पंचनामे पूर्ण होताच, शासनाकडेमागणी केली जाईल. सर्व यंत्रणेला पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

loading image
go to top