जालना जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; आंदोलने, उपोषण, मोर्चे आणि निदर्शने करण्यावर बंदी

3Corona_102
3Corona_102

जालना : जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, म्हणून जिल्ह्यात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवेड यांनी पुढील एक महिन्यापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे आंदोलने, उपोषण, मोर्चे आणि निदर्शने करण्यात प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.


जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येकी दिवसाला शंभरी पार नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यात मागील काही दिवसांपासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनावर अतिरीक्त ताण पडत आहे. अशात वातावरणात आंदोलने, मोर्चे, उपोषण, निदर्शने या विविध आंदोलनामुळे अनेक जण एकत्र आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण पडू शकतो.

त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.१४) ते ता.१४ आॅक्टोबर दरम्यान प्रतिबंधात्म आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाला किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयास मागण्याचे निवेदन देताना पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यात मनाई केली आहे. तसेच पुढील एक महिना उपोषण, मोर्चे, निदर्शने करण्यास परवानगी देणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस अधीक्षकांनी करावे, असे ही या आदेशात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची धडक कारवाई
एकीकडे जाफराबाद (जि.जालना) तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली महसुल विभागातील कर्मचाऱ्यांची आढावा बैठक सुरु असताना, दुसरीकडे देऊळगांव ऊगले शिवारातील धामण्यात मात्र चक्क जेसीबी यंत्राने अवैध वाळु उत्खनन करुन वाळुतस्करांची वाळु चोरी सुरु होती.

अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी ता.१० सप्टेंबर रोजी धडक कारवाई करुन जेसीबी जप्त केले. पंरतु ट्रँक्टर फरार झाले आहे. येथील तहसीलच्या सभागृहात जिल्हाधिकारी बिनवडे हे महसुल विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध
योजनांचा आढावा घेतला. सदर बैठकीत महसुल विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी हजर होते. नेमकी ही संधी साधून वाळु चोरट्यांनी वाळू चोरी केली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com