सलमानखान, शाहरुखानला शिक्षा

file photo
file photo
Updated on

नांदेड : आपल्या घरासमोर उभ्या राहिलेल्या एका १७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी सोमवारी (ता. २०) तीन वर्षाची सक्त मजुरी व प्रत्येकी आठ हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

शहराच्या चौफाळा येथील राहणारा विजय माधव कोमटवार (वय १७) हा ता. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी रात्री आठच्या सुमारास जेवण करून घरासमोर थांबला होता. यावेळी त्याच्या समोरून शाहरुखखान कलीमखान पठाण (वय १९), सलमानखान उर्फ रहीमखान (वय १९) दोघे राहणार हातजोडी (चौफाळा) आणि शेख सद्दाम शेख अजहर (वय २१) रा. सैलाबनगर, खडकपूरा हे तिघेजण जात होते. आमच्याकडे डोळे वटारून का पहात आहेस म्हणून या तिघांनी त्याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर तिघांपैकी दोघांनी त्याला धरुन तिसऱ्याने त्याच्या डोक्यात बाजूलाच पडलेले मोठे लाकून घातले. यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने विजय कोमटवार हा खाली कोसळला. तो खाली पडताच मारेकरी तिघेजण पसार झाले. जखमी अवस्थेत विजयला शासकिय रुग्णालयात दाखल केले. 

डोक्याला जबर दुखापत 

लगेच या घटनेचे पडसाद या भागात उमटल्याने इतवारा पोलिस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत जखमीला रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी त्याचा रुग्णालयात जावून जवाब घेतला. त्यानंतर त्याची स्मृती गेली. कारण कवटीला खोलवर मार लागल्याने त्याची प्रकृती खालावली. पिराजी कोमटवार यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास तत्कालीन फौजदार दिनेश सोनसकर यांनी करून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. 

मुंबईच्या डॉक्टरचे साक्ष महत्वाचे

मात्र विजयची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबई येथील जेजे रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉ. वर्णन वेल्हो व डॉ. रुषीकर खरोसेकर यांनी उपचार केला. तब्ब्ल तिन वर्षानी (सन २०१६) विजय बोलु लागला. पोलिसांनी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने यात आठ साक्षिदार तपासले. न्यायालयाने डॉ. वेल्हो व डॉ. खरोसेकर यांचाही जवाब घेतला. शेवटी न्यायाधीश गौत्तम यांनी या प्रकरणात सलमानखान, शाहरुखखान आणि सद्दाम या तिघांना तीन वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी आठ हजाराच्याच दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. एम. ए. बतुला (डांगे) यांनी युक्तीवाद केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com