हवालदाराच्या तोंडावर  कैद्याने फेकला चहा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

बीड शहरात हवालदाराच्या ताेंडावर एका कैद्याने चहा फेकला. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड - कैद्याने चक्क हवालदाराच्या तोंडावर चहा फेकून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करत "तू बाहेर भेट,' अशी धमकी दिल्याची घटना जिल्हा कारागृहात गुरुवारी (ता. पाच) घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा करागृहात गुरुवारी नेहमीप्रमाणे सर्व बंदींना चहा देण्यात आला. त्यावर बंदी व्यंकट रावसाहेब उगले हा पुन्हा चहा घेत असताना "पुन्हा नाही' असे हवालदार बाबूराव जाधव म्हणाले. याचा राग मनात येऊन व्यंकट उगले याने बाबूराव जाधव यांच्या तोंडावर गरम चहा फेकला आणि लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

या प्रकाराने कारागृहातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी बाबूराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्री. तुपे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner threw tea

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: