
सोमेश्वरनगर : पुणे जिल्ह्यातील 'विघ्नहर' वगळता राज्यातील सर्व १९९ साखर कारखाने बंद झाले आहेत. हंगामाअखेर ८५२ लाख टन उसाचे गाळप झाले असून अवघा ९.४८ टक्के साखर उतारा प्राप्त करत ८० लाख ७६ हजार टन साखरनिर्मिती केली आहे. गतहंगामापेक्षा २२१ लाख टन उसगाळप कमी झाल्याने आणि साखर उताऱ्यात तब्बल ०.७७ टक्क्यांची घट झाल्याने साखरनिर्मितीत २९ लाख २४ हजार टनांची मोठी घट झाली आहे. दरम्यान गाळप, साखरनिर्मिती आणि उतारा या तिनही बाबींमध्ये 'खासगी'पेक्षा 'सहकारी'च सरस ठरले आहेत.