
आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळे हीची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील कळंबआंबा येथील हनुमंत इंगळे हे मागील काही वर्षांपासून रोजगाराच्या निमित्ताने भोसरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले. हनुमंत इंगळे व आई सविता इंगळे या दाम्पत्याला प्रियंका व प्रणय अशी दोन मुले आहेत.