Video: ‘एएसपीं’नी शिवजयंती मिरवणुकीत वाजविला ढोल !

गणेश पांडे
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

शिवजयंती मिरवणुकीचे चित्र दरवर्षी बदलत चालले आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांचीदेखील या मिरवणुकीत गर्दी वाढत आहे. यंदाच्या मिरवणुकीत शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग मोठा आहे. सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भगवे फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना सामुदायिक अभिवादन केले. या अभिवादनाची दिवसभर चर्चा होती.

परभणी : शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत ढोल पथकाचे आकर्षण नेहमीच असते. या दमदार वाद्यामुळे मिरवणुकीला भारदस्तपणा येतो. हे पारंपरिक वाद्य असल्याने सर्वांच्याच मनाला या वाद्याचा आवाज भोवतो. बुधवारी (ता. १९) मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या परभणी शहराचे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनादेखील ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही.

शिवजयंती मिरवणुकीचे चित्र दरवर्षी बदलत चालले आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांचीदेखील या मिरवणुकीत गर्दी वाढत आहे. यंदाच्या मिरवणुकीत शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग मोठा आहे. सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भगवे फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना सामुदायिक अभिवादन केले. या अभिवादनाची दिवसभर चर्चा होती. त्यानंतर सांयकाळी निघालेल्या मुख्य मिरवणुकीत परभणी शहराचे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी होते. नितीन बगाटे हे तरुण अधिकारी आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. उच्चपदस्थ अधिकारी असतानाही सर्वसामान्यांमध्ये मिसळून उपक्रमाचा आनंद घेत असतात.

हेही वाचा  - शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर ..

 ढोल वाजविण्याची केली विनंती
बुधवारी (ता. १९) सांयकाळी शहरातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण मिरवणुकीच्या बंदोबस्ताची जबाबदारी ही नितीन बगाटे यांच्याकडे होती. ते स्वतः मिरवणूक बंदोबस्तात हजर होते. ही मिरवणूक शिवाजी चौकात आल्यानंतर श्री. बगाटे यांना ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी मिरवणुकीत सहभागी ढोल पथकाकडे आपल्यालाही ढोल वाजवायचा आहे, अशी विनंती केली. ढोल पथकातील पदाधिकाऱ्यांनीदेखील आनंदाने त्यांच्या कमरेला ढोल बांधून दिला. मग काय, श्री. बगाटे यांनीदेखील ढोल पथकातील कार्यकर्त्यांच्या तालात ताल देत दमदारपणे ढोल वाजविला. एक आयपीएस पोलिस अधिकारी ढोल वाजवित आहे हे समल्यानंतर शिवाजी चौकात बघ्यांची गर्दी झाली. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी आनंदाने श्री. बगाटे यांचे कौतुकही केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the procession of 'ASPs' Playing drums!