लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापकांनी केली प्रार्थना | Lata Mangeshkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lata Mangeshkar News

लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापकांनी केली प्रार्थना

औराद शहाजानी (जि.लातूर) : लता दीदींचे औरादच्या शिक्षण क्षेत्राशी मदतीची नाळ जोडल्याने शारदोपासक शिक्षण संस्थेने भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शनिवारी (ता.२२) प्रार्थना केली. लता दीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने औराद शहाजानी येथे महाविद्यालय कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या उभारणी वेळी व नंतरही लता दीदी व कुटुंबियांचे औरादच्या भूमीला पदस्पर्श झाले आहेत. दीदींनी महाविद्यालयाच्या उभारणीसाठी एक संगीत (Music) रजनीचा कार्यक्रमही औरादला केला होता. लता दीदी मागील काही दिवसांपासून रूग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी संपूर्ण जगभर रसिक प्रार्थना करीत आहेत. त्याप्रमाणेच येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात शनिवारी शारदोपासक शिक्षण संस्थेकडून दीदींच्या दीर्घायुष्यासाठी होमहवन, प्रार्थना व महामृत्युंजय जपाचे यज्ञ करण्यात आले. (Professors, Students Pray For Long Life To Lata Mangeshkar)

हेही वाचा: लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, अद्याप आयसीयुमध्ये...

यावेळी महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे अनंत गोदरे, दुर्गादास सबनीस व उपस्थितांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे गुरुजी, संचालक किशनरेड्डी भिंगोले व प्राचार्य डॉ अजितसिंह गहेरवार यांच्या हस्ते महामृत्युंजय यज्ञ संपन्न झाले. या प्रसंगी पौरोहित्य प्रकाश कच्छवा व काशीनाथ सज्जनशेट्टी यांनी केले. यावेळी संस्थेचे उपसचिव बस्वराज वलांडे, दगडू गिरबणे, मडोळय्या मठपती, उपप्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच संस्था अंतर्गत संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latur Update)