मराठवाडा पदवीधर निवडणूकीचा बिगुल वाजला; एक डिसेंबरला होणार मतदान, जिल्ह्यात १६,२७६ मतदार

graduate constituency
graduate constituency

हिंगोली : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचा कार्यक्रम निवडणूक विभागाने सोमवारी जाहीर केला असून, एक डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यात १६ हजार २७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघात निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने (ता.२) पासून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० आचारसंहिता लागू झाली आहे.

त्यानुसार सहा तारखेला निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल उमेदवाराकडून अर्ज भरणे सुरु होईल. (ता.१७) ला उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, एक डिसेंबरला सकाळी आठ ते पाच यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. तर सात डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दोन डिसेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

जिल्ह्यात १६ हजार २७६ मतदार असून तालुका निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात ११ मतदान केंद्राची संख्या असून ३,२९९ पुरुष तर १,०२८ महिला आहेत. असे एकूण ४,२२७ मतदार आहेत. कळमनुरी तालुक्यात आठ मतदान केंद्र असून ३,०७५ पुरुष तर ६३६ महिला असे मिळून एकूण ३,७११ मतदार आहेत. सेनगाव तालुक्यात सहा मतदान केंद्र असून यात १,६७५ पुरुष तर २०६ महिला असे एकूण १,८८१ मतदार आहेत.

याशिवाय वसमत तालुक्यात दहा मतदान केंद्र असून ३,३८१ पुरुष तर ९०९ महिला असे एकूण ४,२९० मतदार आहेत. औंढा तालुक्यात चार मतदान केंद्र असून यात १,७६६ पुरुष तर ३०१ महिला असे एकूण मिळून २,०६७ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण ३९ मतदान केंद्रावर १६ हजार २७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com