

Water ATM in Ardhapur: Getting Purified Cold Water at Just 50 Paise per Liter
Sakal
अर्धापूर : पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.रखरखत्या उन्हाळ्यात व वाढत्या महागाईच्या काळात स्वस्त पाण्याचा थंडावा मिळत आहे.नागरीकांना थंड व शुद्ध पाणी मिळण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे फिल्टर केलेले शुध्द व थंड पाणी नागरिकांना एक लिटर पाणी. अवघ्या पन्नास पैशांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.यासाठी नागरिकांना स्मार्ट कार्ड नागरिकांना देण्यात आले आहे.तसेच स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले आहे.या केंद्रातुन दररोज दोन हजार लिटर पाण्याचे वितरण करण्यात येत आहे.या प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.