esakal | सेलूत शंभर खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव धुळखात पडला- लोकप्रतिनिधींची अनास्था
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू शहरात रेल्वे स्थानक असल्यामूळे या शहरात ये- जा करण्यासाठी नागरिकांना हे शहर सोयीचे आहे.

सेलूत शंभर खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव धुळखात पडला- लोकप्रतिनिधींची अनास्था

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : येथिल उपजिल्हा रुग्णालय अनेक वर्षापासून पन्नास खाटांचेच आहे. सेलू तालुक्याची संख्या व इतर पाच तालुक्यातील रुग्ण येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नियमीत येत आहेत. रुग्णांची संख्या व तेथिल सुविधा, कर्मचारी संख्या पहाता या ठिकाणी शंभर खाटांचे रुग्णालय व्हावे असा प्रस्ताव संबधित खात्याकडे पाठविण्यात आला असूनही केवळ लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे येथिल रुग्णालय शंभर खाटांचे होवू शकत नसल्याने सेलूकरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सेलू शहरात रेल्वे स्थानक असल्यामूळे या शहरात ये- जा करण्यासाठी नागरिकांना हे शहर सोयीचे आहे. तसेच शहराच्या पूर्वेस असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला पूरेशी जागाही उपलब्ध असल्यामुळेच या शहराला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सेलू तालुक्याची लोकसंख्या एक लाख ६९ हजार १७४ इतकी असून तालुक्या लगत असलेल्या परतूर, मंठा, जिंतूर, पाथरी व मानवत या पाच तालुक्यातूनही बहूतांश रुग्ण केवळ उपचार घेण्यासाठी येथिल उपजिल्हा रुग्णालयात येतात. 

सद्य: स्थितीत येथिल उपजिल्हा रुग्णालय पन्नास खाटांचे असून मंजूर पदे  २९ आहेत. या रुग्णालयात दरमहा शंभर ते दिडशेपर्यंत स्वाभाविक प्रसुती तर पंधरा ते वीस सिझेरियन प्रसुती होतात. तसेच बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची संख्या भरपूर असते. त्यामुळे तालुक्यासह इतर पाच तालुक्यांची जवळपास पाच लाख २१ हजार इतक्या लोकसंख्येला गुणात्मक सेवा मिळण्यासाठी येथिल उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे होणे गरजेचे आहे. शंभर खाटांचे रुग्णालय झाल्यास या रुग्णालयातील नविन ६८ कर्मचारी पदे मंजूर होतील. व अद्यावत सुविधाही रुग्णांना मिळतील अशी मागणी सेलूकरांतून होत आहे.

सेलू तालुक्यात आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या येथिल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार मिळत असल्यामुळे सेलू तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दायित्वामुळे शासकीय रुग्णालयावरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे उपचारासाठी दरदिवशी रुग्ण संख्या वाढत असून आरोग्यसेवेसह दर्जेदार सुविधा रुग्णांना वेळीच मिळाव्यात याकरिता अतिरिक्त शंभर खाटांची मागणी सेलू तालुक्यातील नागरिक करत आहेत. आताच मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी येथील रुग्णालयात अतिरिक्त खाटा मंजूर झालेल्या असून उपजिल्हा रुग्णालय सेलू येथील प्रलंबित शंभर खाटांची मागणीसुद्धा लवकरच मंजूर व्हावी हि राज्याच्या आरोग्यमंत्रांकडून सेलूकरांना अपेक्षा आहे.

-अभिजित राजुरकर, अध्यक्ष, मोरया प्रतिष्ठाण, सेलू जि. परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image