Beed Crime : कला केंद्राच्या नावाखाली चालायचा वेश्या व्यवसाय; दहा पीडितांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा
Beed News : केज तालुक्यातील उमरी येथे कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून १० महिलांची सुटका करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली.
बीड : कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा मारून १० पीडितांची सुटका करण्यात आली. केज तालुक्यातील उमरी येथे हा प्रकार सुरू होता. यात कला केंद्रचालक महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.