ग्रामस्थच करणार गावाचे संरक्षण

akhada Balapur gast
akhada Balapur gast
Updated on

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरातील चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी आता ग्रामसंरक्षण दल सज्ज केले आहे. ग्रामसंरक्षण दलाच्या माध्यमातून चोरीच्या घटना रोखण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामसंरक्षण दलाच्या सदस्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत ८४ गावे येतात. पोलिस ठाण्याअंतर्गत डोगरकडा, रामेश्वर तांडा येथे चौकी असून वारंगा फाटा येथे मदत केंद्र आहे. तसेच आखाडा बाळापूर, बोल्डा फाटा, येहळेगाव तुकाराम, साळवा बीट आहेत. पोलिस ठाण्याचा कारभार पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दोन व ५० कर्मचाऱ्यांवर चालत आहे. ५० कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचारी संलग्न आहेत. तसेच मेडीकल रजा व किरकोळ रजेवर प्रत्येकी तीन आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष ३४ कर्मचाऱ्यांना ८४ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

चोरट्यांचा धुमाकूळ

यातही सण, उत्सव, मंत्री, नेत्यांचे दौरे यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांना व्यस्त राहावे लागत आहे. गावाच्या तुलनेत नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असल्याने सुरक्षा व्यवस्था सांभाळताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा चोरटे फायदा उचलत आहेत. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत मागील पंधरवड्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. सालापूर, येहळेगाव गवळी, सिंदगी, वारंगाफाटा आदी भागामध्ये चोरट्यांनी घरे फोडून लाखोंचा ऐवज पळविला. विशेष म्हणजे सालापूर येथे सलग दोन दिवस चोरीच्या घटना घडल्या. या प्रकारानंतर पोलिस यंत्रणादेखील हादरून गेली होती.

ग्रामसंरक्षण दल स्थापन

 त्यानंतर पोलिस निरीक्षक विकास थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, हनुमंत नखाते, जमादार संजय मार्के, मदन गव्हाणे, गजानन मुटकुळे, श्री. चव्हाण यांनी ग्रामसंरक्षण दल सत्र करण्यास सुरवात केली. त्यासाठी अधिकाऱ्यांनी परिसरातील ग्रामीण भागामध्ये भेटी देऊन गावकऱ्यांच्या बैठका घेतल्या. याशिवाय तरुणांचे युवक मंडळ स्थापन केले. तसेच ग्रामसंरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी तसेच ग्रामसंरक्षण दलाने सतर्क राहून गावातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी केले आहे.

चोरीच्या घटनांना आळा बसेल

दरम्यान, श्री. थोरात यांनी सिंदगी, सालापूर, बोल्‍डा येथे रात्री गावकऱ्यांची भेट घेतली. तसेच ग्रामसंरक्षण दलाच्या सदस्यांची भेट घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती फिरत असल्यास त्याची कसून चौकशी करावी, तसेच पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. थोरात यांनी केले आहे. ग्रामसंरक्षण दल सतर्क झाल्यामुळे आता चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Marathi News Esakal
www.esakal.com