सार्वजनिक बांधकामच्या सुरक्षा रक्षकास मारहाण 

fily photo
fily photo
Updated on

नांदेड: सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कर्तव्यावर असलेल्या एका सुरक्षारक्षकास मारहाण करुन शासकीय दस्तऐवज फाडण्याची घटना शनिवारी (ता.२८) घडली होती. सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चार जना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


स्नेहनगर भागात एकाच प्रशासकीय ईमारतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ कार्यालय, राष्ट्रीय महामार्गचे कार्यालय आहे. बहूचर्चीत डांबर घोटाळ्याची ठिणगी नांदेडमधून पेटल्याने राज्यात खळबळ उडाली होती. डांबर घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने प्रशासकीय स्तरावर चौकशी, तपास सुरु आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळ कार्यालयाचे सुरक्षा रक्षक श्यामसुंदर गायकवाड हे शनिवारी रात्री कर्तव्यावर असताना अज्ञात चार व्यक्ती तिथे आले. ‘आम्ही अधिक्षक अभियंता श्री. धोंडगे यांना बोलणार आहोत, डांबर घोटाळ्याचा मुद्दा आम्हाला हिवाळी अधिवेशनात मांडायचा आहे, आम्हाला आत जाऊन कागदपत्र बघु दे’ असे म्हणत सुरक्षा रक्षक श्री. गायकवाड यांच्याशी हुज्जत घालू लागले. पण सुरक्षा रक्षक श्यामसुंदर गायकवाड यांनी ‘ जे काही असेल ते कार्यालयीन वेळेत येवून स्वत: अधिक्षक अभियंता यांच्याशी बोलून घ्या’ असे म्हणून त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. 

आरोपींकडून मारहाण
ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या चारही आरोपींनी सुरक्षा रक्षक श्यामसुंदर शिंदे यांना शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले. सुरक्षा रक्षक श्री गायकवाड जखमी अवस्थेत असल्याचा गैरफायदा घेवून आरोपींनी कार्यालयात प्रवेश करत काही महत्वाचे दस्तऐवजाचे नुकसान केले. सुरक्षा रक्षक श्री. गायकवाड यांनी फोनद्वारे भाग्यनगर पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता बराच वेळ तांत्रीक अडचणीमुळे संपर्क होवू शकला नाही. त्यानंतर आरोपींनी कार्यालयातून पळ काढला. 

कार्यालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 
बहूचर्चीत डांबर घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पुरावे मिळविण्यासाठी का, नष्ठ करण्यासाठी कृत्य केले हे तपासाअंती समोर येणार असले तरी. सुरक्षा रक्षकास मारहाण करुन थेट शासकीय कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अनोळखींच्या धाडसापेक्षा शहरातील शासकीय कार्यालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळ कार्यालयातील शासकीय कागदपत्रे फाडून पसार झालेल्या अनोळखी चारजणांच्या विरोधात सुरक्षा रक्षक श्यामसुंदर गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भाग्यनगर पोलिस करत आहेत. 

येथे क्लिक करुन पहा ....मोबाईल चोरांची टोळी जेरबंद

पोलिस तपासात होणार उघड
सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ कार्यालयामध्ये डांबर घोटाळ्या संबधीत शासकीय दस्तऐजव लंपास करण्याच्या उद्देशान घडलेल्या प्रकारात नेमक्या कोणत्या कागपत्रांचे नुकसान झाले हे पोलिस तपासात उघड होणार असले तरी, प्रशासनाला कागपत्रांची पुन्हा जुळवा जुळव करावी लागणार असून घटनेमागील आरोपींसह त्यांचा उद्देश काय असावा  हा प्रश्न तुर्तास अनुत्तरीत आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com