
नांदेड : महिला मुक्तीदिनाच्या औचित्य साधून व माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ता. तिन जानेवारी रोजी महिला मुक्तीदिन परिषद आयोजित करण्यात अली आहे.
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ता. २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतीय स्त्रियांना व या देशातील वंचित जाती समूहांना बहिष्कृत ठरवून गुलाम बनविणार्या मनुस्मृती या जाचक ग्रंथाचे सार्वजनिक दहन केले. हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मागील अनेक वर्षांपासून भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ता. २५ डिसेंबर हा दिवस महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जात आहे. यावर्षी ही महिला मुक्तीदिन परिषद तिन जानेवारी २०२० रोजी सावित्री फुले यांच्या जयंतीदिन आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा ----मोबाईल चोरांची टोळी जेरबंद
महिला पदाधिकारी करणार मार्गदर्शन
शहरातील महात्मा फुले सभागृहात सकाळी १० वाजता संपन्न होणार्या या परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या राज्यध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या अरुंधती शिरसाठ यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन होणार आहे. या परिषदेला प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्रा. मायाताई भालेराव, कवयित्री मायाताई भद्रे, डॉ. सारिका पंडित, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. कविता बोरीकर वंचितच्या जिल्हाध्यक्षा दैवशाला पांचाळ आदींचे प्रमुख मार्गदर्शक लाभणार आहे.
पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार
पक्ष निरीक्षक बालाजी शिंगे राज्य प्रवक्ता फारुख अहेमद मायक्रो ओबीसींचे राज्य प्रमुख गोविंद दळवी, राज्य उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड , प्रा. रामचंद्र भरांडे, प्रा. हमराज उईके, डॉ. संघरत्न कुऱ्हे, शिवा नरंगले, हाजी सय्यद खान, मोहन राठोड , डॉ सुदर्शन राम भारती, मारोतराव कवळे, मुकुंद चावरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
येथे क्लीक करा---‘या’ शहरात परवडणाऱ्या घरांचे हवे नियोजन
सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे
या परिषेदेला जनतेने व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजयालक्ष्मी सोनटक्के, गयाताई कोकरे, महमदी बेगम शेख, मीनाक्षी धनजकर, प्रियंका गोरे, कौश्यल्या रणवीर, रेणुका दिपके, प्रज्ञा अटकोरे, राधाबाई कासले, यशोदाबाई महाबळे, रेखा ढवळे , चंद्रकला चापळकर, विजयमाला नरवाडे, नेहा ढवळे, सुनीता कापसीकर, कल्पना कुर्तडीकर, कविता जावळे, संगीता राठोड, सोनी कांजालकर, सुनीता वनंजे, लक्ष्मीबाई बडूरवार आदींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.