esakal | Lockdown : जालन्यात कडकडीत बंद, रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Public curfew in Jalna

सोमवारी शहर कडकडीत बंद होते. शहरातील चौका-चौकांसह गल्लीबोळात पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. 

Lockdown : जालन्यात कडकडीत बंद, रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना - जिल्ह्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण आठशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. २६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरात आहेत. त्यामुळे सोमवारपासून (ता. सहा) शहरात दहा दिवसांचे कडक लॉकडाउन लागू करण्यात आल्याने सोमवारी शहर कडकडीत बंद होते. शहरातील चौका-चौकांसह गल्लीबोळात पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. 

किराणा, भाजीपालाही बंद 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून (ता. सहा) दहा दिवसांचे लॉकडाउन लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या लॉकडाउनच्या काळात किराणा, भाजीपाला खरेदीच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत होते. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दहा दिवस किराणा, भाजीपाला मार्केटही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिल्याने शहरातील एकाही चौकात किंवा रस्त्यावर सोमवारी नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. 

मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला
 
आरोग्य तपासणी सुरू 
शहरात दहा दिवसांच्या लॉकडाउनबरोबरच जिल्हाधिकारी बिनवडे यांच्या आदेशाने आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांसह ६० वर्षांपुढील व्यक्तींना मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार असलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
 
समिती पुरवणार जीवनावश्यक वस्तू 
शुक्रवारी (ता. तीन) जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस., आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह सर्व नगरसेवकांची बैठक झाली होती. यात शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळाव्यात, यासाठी प्रत्येक वॉर्डात नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जाणार आहेत; तसेच पालिकेकडून शहरातील वाॉर्डनिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 

प्रियांका गांधी यांचा सरकारी बंगला भाजप आयटी सेल प्रमुखाला मिळणार
 
पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
या लॉकडाउनमध्ये शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील चौका-चौकांसह गल्लीबोळात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे; तसेच पोलिसांची सतत गस्त शहरात सुरू होती. शहरातील गल्लीबोळांचा विचार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून बुलेटवर शहरात गस्त करण्यात आली. दरम्यान, बंदोबस्ताकामी २२ अधिकारी, १९७ पोलिस कर्मचारी, ९९ होमगार्डस् तैनात करण्यात आले आहेत. 
 
पोलिस अधीक्षक स्वतः रस्त्यावर 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या दहा दिवसांच्या लॉकडउनच्या पहिल्याच दिवशी पोलिसांकडून कसा बंदोबस्त केला जात आहे, याची पाहणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. हे स्वतः शहरात फिरले. त्यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन लॉकडाउनसह बंदोबस्ताची पाहणी केली. 
 
कोरोनाची साखळी तुटण्याची अपेक्षा 
कोरोनाचा बाधितांची संख्या आठशेवर जाऊन ठेपली आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या आलेखावर अंकुश ठेवण्यासाठी शहरात लागू करण्यात आलेल्या कडकडीत दहा दिवसांच्या लॉकडाउनमुळे नागरिकांची होणारी गर्दी थांबणार आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. 

loading image