esakal | मराठवाडा साहित्य संमेलनात ‘कृषिका’,‘कृता’ चे प्रकाशन Marathwada
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

मराठवाडा साहित्य संमेलनात ‘कृषिका’,‘कृता’ चे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाडा (Marathwada) साहित्य परिषदेचे लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलनात कादंबरीकार व संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्याहस्ते कांचन चव्हाण-पवार लिखित ‘कृषिका’ काव्यसंग्रह व ‘कृता’ चारोळी संग्रहाचे प्रकाशन पार पडले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, म.सा.प.चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, राजेश करपे, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: दिल्लीला जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक

कांचन चव्हाण-पवार यांच्या ‘कृषिका’ कविता संग्रहातील कविता या ज्वलंत विषयावर आधारित असून, त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा, दुष्काळ, नारीशक्ती, बलात्कार पीडित महिलांची व्यथा, कोरोना महामारी याविषयी लेखन केले आहे. तर ‘कृता’ चारोळी संग्रहातील चारोळ्या या काही चित्रावरील आधारित आहेत.

loading image
go to top