बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा

file photo
file photo

नांदेड : भोकर तालुक्यातील हाडोळी येथील एका पंधरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास भोकर न्यायालयाने शनिवारी (ता. १८) तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय आरोपीस नऊ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

भोकर तालुक्यातील हाडोळी येथील पंधरा वर्षीय फिर्यादी मुलगी ही दुपारी दोनच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या बोळीत शौचास गेली होती. यावेळी आरोपी गोविंद भगवानराव जाधव यानत्या बालिकेस उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने तिला मारहाण करून तेथून पलायन केले. हा सर्व प्रकार पीडितेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाइकांनी भोकर पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. यावरून भोकर पोलिस ठाण्यात गोविंद जाधवविरूध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधसह अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. 

सहा साक्षीदार तपासले

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण देशपांडे यांनी तपास करून भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष पुरावा आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आणि पिडीत बालिकेचे बयान महत्वाचे ठरल्याने न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले. भोकरचे जिल्हा न्यायाधीश एस. एम. शेख यांनी गोविंद भगवानराव जाधव यास तीन वर्षे शिक्षा आणि नऊ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. रमेश राजुरकर यांनी काम पाहिले.

लोहामध्ये पुन्हा मटका तेजीत 

नांदेड : विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकांनी केलेल्या कारवाईनंतरही पुन्हा कल्याण- मिलन नावाचा मटका तेजीत सुरू झाला. त्यानंतर लोहा पोलिसांनी छापा टाकून चार जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून ७२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहा शहरातील शुक्रवारी (ता. १७) जानेवारी रोजी विश्रामगृहाच्या पाठीमागे मोकळ्या मैदानावर कल्याण-मिलन नावाचा मटका सुरू असल्याची गुप्त माहिती लोहा पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचीन गिरे यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांनी गजानन नागन कांबळे, केशव बालाजी डांगरे, नरसिंग नायके सर्व राहणार लोहा यांना ताब्यात घेतले. डावावरून रोख दोन हजार रुपये व मोबाईल, दुचाकी व अन्य साहित्य असा ७२ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. जुगाऱ्यांना घेऊन पोलिसांनी लोहा पोलिस ठाण्यात हजर केले. त्यांच्या फिर्यादीवरुन वरील तिन व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक श्री. जायभाये करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com