
वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत शहरात (Wasmat city) संचारबंदी (Lockdown) काळात अर्धे शटर उघडून व्यवसाय करणाऱ्या तसेच आरटीपीसीआर व अॅन्टिजन तपासणी न केलेल्या २० व्यापाऱ्यावर मंगळवारी (ता. ११) शहर पोलिसांनी दंडात्मक (police) कारवाई करीत २५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. Punitive action against trader who does not carry RTPCR antigen in Wasmat
शहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने मागील काही दिवसांपासून कडक संचारबंदी सुरु आहे. तसेच व्यापारी, व्यावसायिकांना आर. टी. पी. सी.आर किंवा अँन्टिजन तपासणी प्रशासनाने अनिवार्य केली होती. मात्र दुकानदार संचारबंदीला झुगारुन सर्रास दुकाने सुरू ठेवत आहेत. तसेच अनेक दुकानदारांनी अद्यापही कोरोणा तपासणी केली नाही. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे व मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू सिद्दिकी व नगर परिषदेचे कर्मचारी यांनी मंगळवारी शहरातील आर.टी.पी.सी.आर., अँन्टिजन तपासणी न करणार्या व संचारबंदीमध्ये दुकाने सुरु ठेवलेल्या २० व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत २५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
हेही वाचा - कोरोना प्रतिबंधक लस देताना एक गंभीर प्रकार समोर आला आहे
यामध्ये आंबेडकर पुतळ्याचे अलीकडील किराणा दुकान, जवाहर कॉलोनी कॉर्नरजवळील किराणा दुकान, ठक्कर कॉम्प्लेक्समधील मोबाईल शॉप, मामा चौक मधील हार्डवेअर दुकान, मामा चौकमधील रेडिमेड दुकान, झेंडा चौकमधील रेडिमेड दुकान, झेंडाचौक जवळील भांडे दुकान, हाऊसिंग सोसायटीमधील होम अप्लायसेन्स, शेतीविषयक दुकान, ठक्कर कॉम्प्लेक्समधील मोबाईल शॉप, मोंढा कापड दुकान, मोंढा कॉर्नर इलेक्ट्रिक दुकान, झेंडा चौक मेन रोड कोल्ड्रिंक्स सेंटर, परभणी रोडवरील हॉटेल यांचा समावेश आहे. पथकात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू सिद्दीकी, होमगार्ड गोविंद क्षीरसागर, शेख तोफिक, शेख अन्वर, नगर परिषद कर्मचारी मयूर डहाळे, मस्के असे सहभागी होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.