Farmer Loan Waiver eKYC : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी : ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, सर्व्हर संथ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ई-केवायसी अनिवार्य असताना संथ सर्व्हर, बायोमेट्रिक अडचणी आणि फार्मर आयडीच्या समस्येमुळे पात्र शेतकऱ्यांना वारंवार सेवा केंद्रांचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
Punyashlok Ahilyadevi Holkar farmer loan waiver scheme eKYC delay due to slow server and farmer ID issues in Palshi Sillod

Punyashlok Ahilyadevi Holkar farmer loan waiver scheme eKYC delay due to slow server and farmer ID issues in Palshi Sillod

Sakal

Updated on

सुनिल पांढरे

पळशी : पळशी (ता.सिल्लोड ) शासनाने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आधार पडताळणी (ई-केवायसी) करणे अनिवार्य आहे. परंतु सर्व्हरच्या संथ गतीमुळे ही प्रक्रिया अत्यंत मंदावली असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com