esakal | प्रवाशांना दिलासा! सोमवारपासून पुर्णा-अकोला डेमू लोकल रेल्वे धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

demu train

प्रवाशांना दिलासा! सोमवारपासून पुर्णा-अकोला डेमू लोकल रेल्वे धावणार

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: अकोला-पुर्णा रेल्वे मार्गाने सोमवारपासून (ता. १९) नांदेड - नगरसोल आणि परळी - अकोट तर २२ जुलैपासून परळी - अदिलाबाद दरम्यान असे एकूण तीन डेमू लोकल धावणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी गाडी क्रमाक ५७५४१ नांदेड - नगरसोल डेमू लोकल नांदेड येथून दुपारी तीन वाजता निघून नगरसोल येथे रात्री १०.५५ ला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात २० जुलै पासून गाडी क्रमांक ५७५४२ नगरसोल - नांदेड डेमू लोकल नगरसोल येथून सकाळी ५.४६ वाजता निघून नांदेड येथे दुपारी २.४० ला पोहोचणार आहे.

सोमवारी (ता. १९ जुलै) गाडी क्रमांक ५७५८२ पूर्णा - अकोला डेमू लोकल पूर्णा येथून सकाळी सात वाजता निघून अकोला येथे दुपारी १.४५ ला अकोट येथे पोहोचणार आहे. परतीत सोमवारी (ता.१९ जुलै) रोजी गाडी क्रमांक ५७५३९ अकोला - पूर्णा डेमू लोकल अकोट येथून दुपारी दोन वाजता निघून पूर्णा येथे रात्री ८.३० वाजता पोहोचणार आहे.

हेही वाचा: ED चे व्हिडिओकॉनशी संबंधित ठिकाणांवर छापे; घराचीही झाडाझडती

२२ जुलै पासून गाडी क्रमांक ५७५५४ अदिलाबाद - परळी डेमू लोकल अदिलाबाद येथून सकाळी ३.३० ला निघून परळी येथे दुपारी १२.४० ला पोहोचणार आहे . परतीत त्याच दिवशी गाडी क्रमांक ५७५५१ परळी - अदिलाबाद डेमू लोकल परळी येथून दुपारी ३.४५ वाजता निघून अदिलाबाद स्थानकावर रात्री १२.५५ ला पोहोचणार असल्याचे रेल्वे स्टेशन मास्टर रामसिंग मीना यांनी सांगितले.

हेही वाचा: मायंबा-मढी नाथस्थाने ‘रोप-वे’ने जोडली जाणार

दरम्यान डेमु लोकल गाडी पुर्णा येथून निघाल्यावर ती गाडी वसमत, चोंढी, सिरळी, बोल्डा, नांदापुर, धामणी, हिंगोली, नवलगव्हान, मालसेलु, कनेरगाव नाका, केकतउमरा, वाशिम, जऊलका, अमानवाडी, लोहगड, बारशी टाकळी, शिवणी शिवापूर, अकोला या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याचे रामसिंग मीना यांनी सांगितले.

loading image