
पूर्णा : ‘काट्यामधली फुले हासुनी, म्हणती काय आम्हाला, दुःख आपुले उरात ठेवुनी वाटा सौख्य जगाला’ या कवितेच्या ओळी येथील मूर्तिकार पिंपरणे परिवाराकडे पाहून आठवल्याशिवाय राहत नाही. घरातील दोन कर्ती माणसे नियतीने हिरावून नेल्यावरही ते डोंगराएवढे दुःख दूर सारत हा परिवार आज मूर्तीच्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करीत आहे.