esakal | भाजप उद्योग आघाडीचा पाठपुरावा ; उद्योजकांना दिलासा- समीर दुधगावकर

बोलून बातमी शोधा

समीर दुधगावकर
भाजप उद्योग आघाडीचा पाठपुरावा ; उद्योजकांना दिलासा- समीर दुधगावकर
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : भाजप उद्योग आघाडीच्या पाठपुराव्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचा विश्वास उद्योजक आघाडीचे मराठवाडा संयोजक समीर दुधगावकर यांनी व्यक्त केला.

कोवीड- १९ विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकार उद्योजकांना अडचणीत आणत होते. त्यामुळे ता. नऊ ते ता. १२ एप्रिल दरम्यान भाजप उद्योग आघाडीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील २५ ते ४५ वयोगटातील कामगारांना लस देण्यासाठी आणि दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर तपासणी करण्यास लावू नये असे दोन मुद्दे उचलले होते. ते सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचे श्री.दुधगावकर म्हणाले.

केंद्र सरकारने अठरा वर्षे वयाच्या पुढील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच राज्य शासनाने भाजप उद्योग आघाडीचा पाठपुरावा पाहता दर १५ दिवसांनी कामगारांची आरटीपीसीआर (RTPCR)टेस्ट करणे बंधनकारक नसल्याचे असे निर्देश दिले असल्याची माहिती भाजप उद्योग आघाडी मराठवाडा संयोजक समीर दुधगांवकर यांनी दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे