Mahavitaran : एक महिन्यापासून पुयणी खुर्द अंधारात; वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार

डासांचा प्रादुर्भाव आणि त्यातच लाईट नसल्याने अनेक ग्रामस्थ व शाळकरी मुले आजारी पडल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत
Electricity Distribution Company
Electricity Distribution Companyesakal
Updated on

वसमत : तब्बल तीन आठवड्यापासून तालुक्यातील पुयणी खुर्द, पारवा पळसगाव हे तिन्ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वीज वितरण कंपणीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि त्यातच लाईट नसल्याने अनेक ग्रामस्थ व शाळकरी मुले आजारी पडल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दरम्यान, या तिन्ही गावातील संतप्त नागरिकांनी बुधवारी ता.१० वसमत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.‌ यानंतर संबंधित अभियंत्याने वीज प्रवाह सुरळीत करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन थांबवले.

Electricity Distribution Company
Jalgaon News : खेडी शिवारात पक्क्या पुलाची मागणी; नाल्याचे पाणी घरात आल्याने नागरिकांचे हाल

वसमत तालुक्यातील पारवा, पुयणी खुर्द व पळसगाव तर्फे धामणगाव हे कमी लोकसंखेचे गावे आहेत. या गावांना शिरडशहापूर येथील ३३ केव्ही वरुन वीज जोडण्यात आलेली आहे.‌परंतू या गावांना वीज पुरवठा पा़गरा बोखारे येथून असून याच ठिकाणी विद्यूत पुरवठा बंद किंवा सुरु करणारे एबी स्विच आहे. त्यामुळे अनेकदा साधारण वारे किंवा पाऊस झाला तरी हे स्विच बंद होते. नेमके स्विच वार्याने बंद होते की कोणी अज्ञात व्यक्ती बंद करतो हे कळायला मार्ग नाही. मात्र सदरील प्रकार मागील तीन आठवड्यापासून सुरु असून सदरील तिन्ही गावांना त्याचा फटका बसत आहे.‌ अंधारातच रात्र काढण्याची वेळ या गावातील कुटूंबियांवर आली आहे.‌दरम्यान सध्या पाऊस सुरू झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

अशातच विद्यूत पुरवठा सुरू नसल्याने अनेक ग्रामस्थांना व शाळकरी मुलांना साथीच्या आजाराने ग्रासले आहे. वसमतच्या खाजगी रुग्णालयात त्या़च्यावर उपचार सुरु असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.‌ तसेच मागील महिन्यात पांगरा बोखारे येथील युवा शेतकऱ्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतात नापिकी होऊन आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान बुधवारी पुयणी खुर्द, पारवा व पळसगाव तर्फे धामनगाव येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.‌ तसेच उपविभागीय अभियंत्यास निवेदन दिले. यावेळी लोकप्रतिनिधी आमची दखल घेत नसल्याची नाराजी संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केली.‌ संबंधित अभियंत्यांनी आज रात्रीपासूनच विज पुरवठा सुरळीत करण्याची हमी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.