esakal | संतापजनक : क्वारंटाइन गरोदर मातेसह मजुरांना मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुंबईहून गावात आलेल्या व स्वतःच्या शेतात क्वारंटाइन झालेल्या ग्रामस्थांना शेतात थांबा, असे म्हणल्याने झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. यात एका गरोदर मातेच्या पोटात लाथ मारल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

संतापजनक : क्वारंटाइन गरोदर मातेसह मजुरांना मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हट्टा (जि. हिंगोली) : मुंबईहून गावात आलेल्या व स्वतःच्या शेतात क्वारंटाइन झालेल्या ग्रामस्थांना शेतात थांबा, असे म्हणल्याने झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना हट्टा (ता. वसमत) येथे बुधवारी (ता. २७) घडली. यात एका गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्याने महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

हट्टा (ता. वसमत) येथील अनेक कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे ग्रामस्थ गावाकडे परत येत आहेत. काही दिवसांपूर्वी येथे आलेल्या एका कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून त्‍यांना क्‍वारंटाइन होण्यास सांगितले होते.

हेही वाचा - पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एकाचा खून

चौदा दिवसांचा कालावधी संपला

त्यानुसार हे कुटुंब गावापासून काही अंतरावर असलेल्या त्‍यांच्या शेतात थांबले होते. या कुटुंबीयांचा चौदा दिवसांचा कालावधी बुधवारी (ता. २७) संपला. त्यातील दोघेजण शेताजवळच्या रस्त्याच्या कडेला बसले होते. यावेळी दोन गावकरी या रस्त्याने जात असताना रस्‍त्‍यावर बसलेल्या दोघांना ‘तुम्ही बाहेर का निघत आहात.

गावकऱ्यांची शेतात धाव

रस्‍त्यावर बसण्यापेक्षा तुमच्या शेतात बसा’ असे म्‍हणून ते समोर निघून गेले. पंरतु, ते दोघे परत येत असताना शेतात थांबलेल्या काही युवकांनी मारहाण केली. या दोघांनी सदर घटना गावात सांगितली. त्यामुळे गावातून अनेक गावकऱ्यांनी शेतात धाव घेऊन क्वारंटाइन असलेल्या सदस्यांना मारहाण केली.

परस्परविरोधी गुन्हे दाखल

यात एका गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारल्याने ती रस्त्यावर पडली. त्यामुळे गरोदर मातेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गोविंद भीमराव शेळके यांच्या फिर्यादीवरून सुरेश जाधव, रावसाहेब जाधव, राजाराम शिंदे, श्यामराव जाधव व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

येथे क्लिक करा -शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्षक आमदार म्हणाले...

दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तर बेबी सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ शेळके, गोविंद शेळके, चंद्रकांत शेळके, नितीन शेळके, गौतम शेळके, राहुल शेळके, भीमा शेळके, राहुल शेळके, राहुल ससाणे, सिद्धांत शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वादाचे प्रकार वाढले

मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरात कामानिमित्त गेलेले ग्रामस्थ आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परत येत आहेत. मात्र, गावात आल्यानंतर परत आलेल्या ग्रामस्थांना शाळेतील क्वारंटईन कक्षात ठेवले जात आहे. काही ग्रामस्थ शेतातच क्वारंटाइन होत आहेत. मात्र, सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून ग्रामस्थ व क्वारंटाइन झालेल्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत.

loading image
go to top