क्वारंटाईन तरुणासोबत शाळेतच झाले भांडण, बीड जिल्ह्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

एका क्वारंटाईन केलेल्या तरूणासोबत रविवारी अंबेवडगाव गावातील एका तरुणाचे मोबाईल व्हाटसअॅपवरील मॅसेजच्या कारणावरून भांडण झाले. यानंतर गावातील तो तरुण मित्रासह शाळेत क्वारंटाईन केलेल्या तरुणाकडे गेला. दोघात शाब्दिक वाद झाला.

किल्लेधारूर (जि. बीड) - पुणे, मुंबईसह रेड झोनमधून गावात आलेल्या लोकांना क्वारंटाईन  करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत व दक्षता समितीना दिलेले आहेत. त्याप्रमाणे तालुक्यातील अंबेवडगाव ग्रामपंचायतीने काही लोकांना जिल्हा परीषद शाळेत क्वारंटाईन करून शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

एका क्वारंटाईन केलेल्या तरूणासोबत रविवारी अंबेवडगाव गावातील एका तरुणाचे मोबाईल व्हाटसअॅपवरील मॅसेजच्या कारणावरून भांडण झाले. यानंतर गावातील तो तरुण मित्रासह शाळेत क्वारंटाईन केलेल्या तरुणाकडे गेला. दोघात शाब्दिक वाद झाला. दोन तरुणांच्या भांडणात सोशल डिस्टटंन्ससह इतर सर्व नियम धाब्यावर बसवत दोघांच्याही घरच्या महिला-पुरुषांनी सहभागी होत एकमेकांवर शिव्यांचा भडीमार करत सर्वजण एकमेकांच्या समोरासमोर तोंडाजवळ तोंड नेत भांडताना दिसत होते.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

दोन तरुणांचे शाळेत सुरू असलेले भांडण गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. याबाबत येथील सरपंच पौर्णिमा अशोक भोजने यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घडलेला प्रकार अयोग्य असून, आम्ही दोन्ही तरुणांसह त्यांच्या कुटुंबाला पोलिसांमार्फत ताकीद दिली आहे. दोन्ही कुटुंब होम क्वारंटाईन आहेत. यापुढे त्यांनी भांडण करून गावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarrel with quarantine youth in Beed district