esakal | लोअर दूधना धरणातून रब्बीतील पिकांना मिळणार पाणी- धरणात शंभर टक्के जलसाठा, शेतकर्‍यात समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण इ.स.२०१६ मध्ये शंभर टक्के भरले होते.त्यावर्षी सेलू शहरासह धरणावर अवलंबून असणार्‍या योजनातून अनेक गावांना पाणी पुरवठा धरणातून करण्यात अाला होता.

लोअर दूधना धरणातून रब्बीतील पिकांना मिळणार पाणी- धरणात शंभर टक्के जलसाठा, शेतकर्‍यात समाधान

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (परभणी) :  यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्यामुळे धरणात चार वर्षानंतर शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाला.त्यामूळे रब्बीतील पिकांना धरणातून पाणी मिळणार असल्याच्या अाशा शेतकरी वर्गाला लागल्या अाहेत.

तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण इ.स.२०१६ मध्ये शंभर टक्के भरले होते.त्यावर्षी सेलू शहरासह धरणावर अवलंबून असणार्‍या योजनातून अनेक गावांना पाणी पुरवठा धरणातून करण्यात अाला होता.तसेच परभणी,नांदेड शहरांनाही या धरणातील पाण्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अाला होता.धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून रब्बीतील उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात अाले होते.याही वर्षी धरण शंभर टक्के भरल्यामूळे धरणाच्या ४८ किलो मिटर असलेल्या उजव्या कालव्यातून व ६९ किलो मिटर असलेल्या डाव्या कालव्यातून शेतकर्‍यांच्या रब्बीतील पिकांना धरणातून पाणी मिळणार असल्याच्या अाशा परिसरातील शेतकरी वर्गाला लागल्या अाहेत.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे सीताफळ उत्पादनात मोठी घ -

हौसी पर्यटक धरणातील मासे पकडण्यासाठी प्रयत्न करित अाहेत

धरणाच्या पाण्यामूळे ३४,००० हेक्टर जमिनी भिजणार अाहे.यावर्षी वरूण राजाच्या कृपेने तब्बल चारवर्षानंतर लोअर दूधना प्रकल्प पूर्ण भरला असून परिसरातून अनेक पर्यटक भव्यदिव्य पाण्याचा नरनरम्य देखावा पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने येत अाहेत.अालेले हौसी पर्यटक धरणातील मासे पकडण्यासाठी प्रयत्न करित अाहेत.विशेष म्हणजे या पाण्यामूळे या ठिकाणी विविध रंगाचे अनेक पक्षी बस्तान मांडून बसलेले सद्य:स्थितीत दिसत अाहे.त्यामूळे पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत अाहे.

पर्यटकांची संख्या वाढली...

लोअर दूधना प्रकल्प धरण यावर्षी पाण्याने पूर्णपणे व्यापले अाहे.याठिकाणी पर्यटकांसाठी खाद्य पदार्थांची अनेक स्टाॅल लावल्या जात असल्यामूळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत अाहे.या ठिकाणी सुशोभिकरण केल्यास हा परिसर पर्यटकांसाठी अाकर्षक ठरू शकतो.अशी मागणी पर्यटकांमधून होत अाहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे