अतिवृष्टीमुळे सीताफळ उत्पादनात मोठी घट

शशिकांत धानोरकर
Wednesday, 28 October 2020


अतिपाऊस व कोरोनाची धास्ती यामुळे दरवर्षी सीताफळ विक्रीतून लाखाचे उत्पादन घेणाऱ्या तळ्याचीवाडी (ता. हदगाव) येथील केशव तोरकड या सिताफळ उत्पादकाचे यावर्षी मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी केशव तोरकड यांनी ६ वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून नरेगातून बांधावर शेती योजनेअंतर्गत अंदाजे चारशे सीताफळांची रोपटे लावली होती. तोरकड यांची शेती ही जंगलक्षेत्रात असून ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडे आहेत. त्यामुळे सिताफळाच्या लागवडीतून चांगली कमाई होईल म्हणून त्यांनी रोपण केलेल्या रोपट्याची व्यवस्थित काळजी घेतली. 
 

तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : अतिपाऊस व कोरोनाची धास्ती यामुळे दरवर्षी सीताफळ विक्रीतून लाखाचे उत्पादन घेणाऱ्या तळ्याचीवाडी (ता. हदगाव) येथील केशव तोरकड या सिताफळ उत्पादकाचे यावर्षी मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी केशव तोरकड यांनी ६ वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून नरेगातून बांधावर शेती योजनेअंतर्गत अंदाजे चारशे सीताफळांची रोपटे लावली होती. तोरकड यांची शेती ही जंगलक्षेत्रात असून ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडे आहेत. त्यामुळे सिताफळाच्या लागवडीतून चांगली कमाई होईल म्हणून त्यांनी रोपण केलेल्या रोपट्याची व्यवस्थित काळजी घेतली. 

 

सीताफळ विक्रीतून हजारो रुपयांची कमाई 
मागील दोन वर्षापासून त्यांना सीताफळाचे उत्पन्न चांगले झाले. ज्यामुळे तोरकड यांच्या कुटुंबाला चांगला आर्थिक आधार मिळाला. यावर्षी मात्र अतिपाऊस होण्यामुळे सीताफळाची संख्या घटून आकारही कमी झाला. त्यात भर म्हणून कोरोना महामारीची धास्ती. या मुळे यावर्षी तोरकड कुटुंबीयांना सीताफळ विक्रीतून अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचा फटका बसला आहे. दरवर्षी तोरकड यांच्या शेतातील सीताफळे खरेदी करण्यासाठी तेलंगणा, विदर्भ या भागात खरेदीदार, व्यापारी मोठ्या संख्येने पहाटेच डेरेदाखल होत असत. यावर्षी मात्र कोरोनामुळे खरेदीदारांची संख्या कमालीची रोडावली होती. कोरोनाचे प्रमुख लक्षणे खोकला व सर्दी असून सीताफळ खाल्ल्यामुळे खोकला व सर्दी होण्याची भीती नागरिकांना असते. त्यामुळे भीतीपोटी सिताफळ खरेदी करून खाण्याकडे नागरिकांनी टाळाटाळ केल्याचे चित्र होते. याचा फटका मात्र दरवर्षी सीताफळ विक्रीतून हजारो रुपयांची कमाई करणाऱ्या सीताफळ विक्रेत्यांना बसला आहे. 

हेही वाचा -  गो कोरोना गो - नांदेड जिल्ह्यात ७०७ रुग्णांवर उपचार सुरू , बुधवारी ११८ कोरोनामुक्त तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह -

सिताफळामुळे नाराजी वाट्याला 
यावर्षी माझ्या कुटुंबाला सीताफळ विक्रीतून अंदाजे सव्वा लाख रुपये मिळकत अपेक्षित होती. पण सततचा पाऊस होण्यामुळे सीताफळांची संख्या घटून आकारही कमी झाला. अनेक सीताफळे ही झाडावरच वाळली. ज्यामुळे यावर्षी फक्त तीस हजार रुपयांचीच सीताफळे विक्री झाली. असे केशव तोरकड, सीताफळ उत्पादक शेतकरी, तळ्याचीवाडी यांनी सांगितले. तसेच कोरोनाचे संकट यावर्षी सिताफळ विक्रेत्यांच्या मुळावर आले आहे. भीतीपोटी नागरिक रानमेवा समजला जाणाऱ्या सीताफळाचा आस्वाद घेण्याचे टाळत आहेत. दरवर्षी सीताफळ विक्रीतून घराला चांगला आधार मिळतो. यावर्षी मात्र सिताफळामुळे नाराजी वाट्याला आली असल्याचे अनिता तोरकड, तळ्याचीवाडी यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sitafal In Custard Production Due To Excess Rainfall, Nanded News