
निलंगा : कार्यकारी मंडळातील उपाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापिकेच्या संगनमताने शिवाजी शिक्षण संस्थेत बेकायदेशीर पदभरती होत असून माझी या संस्थेत 2017 या वर्षी लिपिक पदावर नियुक्ती झाली असताना विद्यमान मुख्याध्यापिका दीपश्री जाधव यांनी शासनाकडे माझा प्रस्ताव न पाठवता दुसऱ्याचा प्रस्ताव पाठवून मान्यता घेतली आहे. याबाबत विचारणा केली असता मलाच धक्काबुक्की करून शिवव्याळ केली व या बेकायदेशीर कर्त्यावर पांघरून घालण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप माजी आमदार कै. श्रीपतराव सोळुंके यांची नात राधिका सोळुंके यांनी रविवारी ता. २३ रोजी पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.