esakal | पावसाने निम्म्या पिकांना दिलासा 
sakal

बोलून बातमी शोधा

rain in beed district

बीड : यंदाच्या पावसाळ्यातील 95 दिवस संपले असून, यात 66 दिवस कोरडे गेले आहेत. 29 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. यामुळे निम्म्या पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे. सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 260 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पावसाने निम्म्या पिकांना दिलासा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : यंदाच्या पावसाळ्यातील 95 दिवस संपले असून, यात 66 दिवस कोरडे गेले आहेत. 29 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. यामुळे निम्म्या पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे. सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 260 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्‍यात, तर सर्वांत कमी पाऊस शिरूर तालुक्‍यात झाला आहे. 
सध्या जिल्ह्यातील 105 प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. येणाऱ्या 25 दिवसांवर जिल्ह्यातील पुढील परिस्थिती अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला होता. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ पडला.

पोळा सणापासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील निम्म्या पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु खरिपाची निम्मी पिके वाया गेली आहेत. सध्या पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान असले, तरी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

loading image
go to top