esakal | पावसामुळे नऊशे हेक्टर ऊस पडला आडवा, शेतकरी आर्थिक अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damaged Cane

जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.

पावसामुळे नऊशे हेक्टर ऊस पडला आडवा, शेतकरी आर्थिक अडचणीत

sakal_logo
By
शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : तालुक्यात शुक्रवारी (ता.२५) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील तब्बल ९२५ हेक्टरवरील ऊस आडवा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी कोरडा दुष्काळ तर अतिवृष्टी यामुळे शेतकरी सतत संकटात सापडला आहे. या वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद शेतकऱ्यांच्या हातचे गेले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

तालुक्यात गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने त्याने मोठ्या प्रमणात ऊसाची लागवड केली. दिवसरात्र करून ऊसाची जोपासना केली. ऊसातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांची एक-दीड महिन्यात ऊस कारखान्यात जाणार होता. पंरतू शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे उभा ऊस आडवा पडल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

निलंगा तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

दरम्यान ऊस वीस टिपऱ्यावर आला असल्याने आडवा ऊस उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. सुरवातीला एकरी चाळीस हजार रुपये खर्च केल्यामुळे शेतकऱ्यांना आडवा ऊस उभा करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे यासाठी पैसे आणावे कुठून हा प्रश्न ऊस उत्पादकांपुढे पडला आहे. सततच्या पावसामुळे आधी मूग, सोयाबीन, उशीर गेले आता ऊस आडवा पडला. त्यामुळे बळीराजाने कसे जगवे हा मोठा प्रश्न पडला आहे.


कर्ज काढून दोन एकर ऊसाची लागवड केली. एकरी पत्तीस हजार रुपये खर्च केला. दिवसरात्र एक करून ऊसाची जोपासना केली. एकाच रात्रीतून ऊस भुईसपाट झाला. आता आम्ही कसे जगावे असा प्रश्न आमच्या पुढे पडला आहे. पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी.
-  एन.डी.धुळे, ऊस उत्पादक शेतकरी, कंरजी


खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग पावसामुळे गेले. ऊस हाताला आला होता. तो वादळी वाऱ्यामुळे हातातून चालला आहे. शेतकऱ्याने जगावे कसे असा प्रश्न पडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आहे.
- अरविंद नागरगोजे, तालुकाध्यक्ष, भाजप, जळकोट

पिकांचे त्वरित पंचनामे करुन अहवाल सादर करा, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top