esakal | मोसंबीची फळ गळती वाढत चालली; भाव चांगला, पण नुकसान सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

Damaged Mosambi

अंबड तालुक्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे आता मोसंबी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मोसंबीची फळ गळती वाढत चालली; भाव चांगला, पण नुकसान सुरुच

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे आता मोसंबी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सततचा पाऊस, रोगराई, नैसर्गिक आपत्तीमुळे फळगतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने मोसंबी झाडाखाली फळांचा सडा पडत आहे. यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी नुकसान होत असल्याने पुरता हतबल झाला आहे.

फळबागा विक्रीला आलेल्या आहे. मात्र पाऊस सुरुच आहे. फळबागा तोडताना व वाहतुकीची कोंडी होत असल्याने मोसंबीची फळे झाडाला तशीच लटकून आहेत. बाजारात मोसंबीच्या भावात आता वाढ होत आहे. यामुळे फळबाग उत्पादकांच्या आशा पल्लवीत होत आहे. मात्र डासामुळे फळगती थांबत नाही. कृषी विभागाने मोसंबी उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची मागणी जोर धरत आहे.

शासकीय यंत्रणा, माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली

याचबरोबर फळबाग उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी मोसंबी उत्पादक पांडुरंग डोंगरे, भागवत उगले, शिवाजी गोंटे, विलास शिंदे, बाबासाहेब ढवळे, सचिन मोरे, दिनेश काकडे, कृष्णा वरे, रामनाथ कडुळे, शिवाजी शेळके, दगडुबा तिकांडे, ज्ञानेश्वर सोंळुके, रामेश्वर धुपे, श्रीधर काळे, राजू डोंगरे, जुबेर पटेलसह
आदींनी मागणी केली आहे.


ऐन मोसंबी फळबागाविक्रीला आल्या आहेत. त्यातच पावसाचा धमाकुळ सुरु आहे. फळाला डास लागल्याने दिवसरात्र गळती वाढत चालली आहे. यामुळे फळबाग विक्री पूर्वीच अतोनात नुकसान होत चालले आहे. एकीकडे सततचा पाऊस, नैसर्गिक आपत्ती, रोगराई तर तर दुसरीकडे जागतिक कोरोना महामारीचे संकट पाठीशी लागल्याने होत्याचे नव्हते झाले आहे.
- बाबासाहेब ढवळे, मोसंबी उत्पादक

सध्या मोसंबीला बाजारात सोळाहजार ते बावीस हजार रुपयांपर्यंत टनाला भाव मिळत आहे. मात्र मोसंबीची म्हणावी त्याप्रमाणात आवक वाढलेली नाही.
- शरद खरपडे, मोसंबीचे व्यापारी

संपादन - गणेश पिटेकर