Osmanabad | पावसाचा कांदा उत्पादकांना फटका, मोठे आर्थिक नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damages Onion Crop
Osmanabad : पावसाचा कांदा उत्पादकांना फटका, मोठे आर्थिक नुकसान

Osmanabad | पावसाचा कांदा उत्पादकांना फटका, मोठे आर्थिक नुकसान

परंडा (जि.उस्मानाबाद) : ऋतु बदलले, महिने बदलेले तरी पावसाची हजेरी कायमच आहे. वातावरणात कायम बदल (Osmanabad Rain) होत आहे. थंडीच्या दिवसात पावसाच्या सरी कोसळत आहेत. झोपताना थंडी, उठताना पाऊस असे चित्र पाहावयास मिळत आहे. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र पावसाची वेळ चुकल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उडीद, मुग या कमी दिवसाच्या पिकांत अनेक दिवस पाणी राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने परिसरातील सर्वच प्रकल्प भरल्याने शेतकरी सुखावला असला तरी वेळी-अवेळी येणाऱ्या पावसामुळे मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालले आहे. या पावसाचा द्राक्ष बागांना (Grapes Garden) मोठ्या (Paranda) प्रमाणात फटका बसला आहे. तर साखर कारखाने सुरु झाल्याने ऊसतोडीसाठी आलेल्या व उसाच्या फडात राहत असलेल्या ऊसतोड कामगारांचे (Onion Crop) मोठ्या प्रमाणात पावसामुळे हाल होत आहेत. (Marathwada)

हेही वाचा: Beed : कोरोना टेस्ट करत आहोत म्हणत टाकला दरोडा; रोकड,दागिने लुटले

या अवकाळी पावसाचा फटका शेकडो कांदा उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे काढणीला आलेला कांदा शेतात सडून चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसामुळे रस्ते खराब होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे तालुका परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.