कन्नड येथील जनआशीर्वाद यात्रेत पावसाचा व्यत्य

राजेंद्र भाेसले
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कन्नड (जि.औरंगाबाद) ः येथे शुक्रवारी (ता.30) वैजापूर येथील दुपारची सभा संपून औराळामार्गे संध्याकाळी दहा वाजता जनआशीर्वाद यात्रा कन्नड येथे पोहोचली. त्यातच आदित्य ठाकरे यांचे मंचावर जेव्हा आगमन झाले आणि लगोलग पावसाला सुरवात होऊन सभेच्या ठिकाणी एकाच गोंधळ उडाला. पावसापासून बचाव व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्‍यावर बसायची खुर्च्या घेतल्या. सभेला आधीच उशीर झालेला असल्याने व पावसाचा अंदास घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची अधिक परीक्षा न घेता मी आपली परीक्षा घेण्यासाठी आलो असून मने जिंकण्यासाठी आलो आहे.

कन्नड (जि.औरंगाबाद) ः येथे शुक्रवारी (ता.30) वैजापूर येथील दुपारची सभा संपून औराळामार्गे संध्याकाळी दहा वाजता जनआशीर्वाद यात्रा कन्नड येथे पोहोचली. त्यातच आदित्य ठाकरे यांचे मंचावर जेव्हा आगमन झाले आणि लगोलग पावसाला सुरवात होऊन सभेच्या ठिकाणी एकाच गोंधळ उडाला. पावसापासून बचाव व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्‍यावर बसायची खुर्च्या घेतल्या. सभेला आधीच उशीर झालेला असल्याने व पावसाचा अंदास घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची अधिक परीक्षा न घेता मी आपली परीक्षा घेण्यासाठी आलो असून मने जिंकण्यासाठी आलो आहे. मी येथे आल्यामुळे पाऊस येत असेल तर मला आनंद होत आहे असे म्हणून आपले भाषण दोन मिनिटांत संपविले. यात त्यांनी पुन्हा कन्नडला येऊन सभा घेणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.

औराळा या गावापासून कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. या भव्य बॅनरने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. विधानसभेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले संतोष कोल्हे यांनी आदित्य ठाकरे याचे आपल्या समर्थकासह हॉटेल सम्राट भव्य स्वागत केले. यावेळी संतोष कोल्हे, उदयसिंग राजपूत,डॉ अण्णासाहेब शिंदे, तालुका प्रमुख केतन काजे ,अवचितनाना वळवळे, शिवाजी थेटे, दिलीप मुठ्ठे ,नगरसेवक बंटी सुरे , शहर प्रमुख सुनील पवार अशोक दापके, उमेश मोकसे यांची प्रमुख उपस्थिती होती

आदित्य ठाकरेंनी केली बैलपूजा

शुक्रवारी पोळा असल्याने तालुक्‍यातील औराळा येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉ.अण्णासाहेब शिंदे यांनी बैल पूजनानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. संध्याकाळी साडेपाच वाजता औराळा येथे जनआशीर्वाद यात्राचे प्रस्थान झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सवंगडी समजल्या जाणाऱ्या बैलाची पूजा केली. यावेळी औराळा परिसरातील पक्ष कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Disrupt Janashirwad Yatra In Kannad