पावसाचा फटका; अर्धे लातूर अंधारात 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 June 2019

वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सोमवारी (ता. तीन) अर्धे लातूर अंधारात होते. दुसऱ्या दिवशीही (ता. चार) शहरातील अनेक भागांत हीच स्थिती कायम होती. दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे, फ्लेक्‍स कोसळण्याच्याही घटना शहरात अनेक ठिकाणी घडल्या.

लातूर -  वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सोमवारी (ता. तीन) अर्धे लातूर अंधारात होते. दुसऱ्या दिवशीही (ता. चार) शहरातील अनेक भागांत हीच स्थिती कायम होती. दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे, फ्लेक्‍स कोसळण्याच्याही घटना शहरात अनेक ठिकाणी घडल्या. त्यामुळे महावितरणसह पालिका प्रशासनाची झोप उडाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. यानिमित्ताने पावसाळी कामे किती सफाईदारपणे झाली आहेत, हेही "उजेडात' आले. 

राज्याच्या अनेक भागांत सोमवारी (ता. तीन) अवकाळी पाऊस येईल, असा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यानुसार लातूर शहरात आणि जिल्ह्यात अनेक भागांत सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्याचवेळी शहरातील जवळजवळ सर्वच भागातील वीजपुरवठा खंडित झाला. टप्प्याटप्प्याने काही भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला; पण बहुतांश भागातील वीज मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरळीत झाली नाही. त्यामुळे अनेक लातूरकरांना सोमवारची रात्र अंधारात आणि मंगळवारची दुपार उकाड्यात काढावी लागली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in latur