Latur Rain: उदगीरला तीस दिवसानंतर पावसाची हजेरी; काही भागात दमदार, काही ठिकाणी मात्र पावसाची प्रतिक्षा कायम
Latur News: उदगीर तालुक्यात ३० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर श्रावणाच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली. काही भागात समाधानकारक पर्जन्यमान तर काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा सुरू आहे.
उदगीर, (जि.लातुर) : तालुक्यात सोमवारी (ता.२१) पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तालुक्याच्या विविध भागांत पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.